fbpx

बीएचआर प्रकरणात जितेंद्र कंडारेला दहा दिवसांची पोलिस कोठडी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ । बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी जितेंद्र खंडारे यांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आज पुढे न्यायालयात हजर केले होते. यावेळी पुढे न्यायालयाने यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

राज्यभर गाजलेल्या बीएचआर घोटाळ्यात प्रकरणात अनेक संशयितांना अटक झाली होती. परंतु मुख्य संशयित असलेला सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र खंडारे हा फरार होता. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून इंदूरमधून अटक केली होती. कंडारेला न्यायालयात कोर्टात हजर केले असता सरकार पक्षातर्फे ऍड.प्रवीण चव्हाण यांनी जितेंद्र कंडारेला पोलीस कोठडी मिळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. त्यानुसार एड. चव्हाण म्हणाले की संशयित आरोपी कंडारे हा विषयांतर करून बाहेर राज्यात लपून बसला होता गुन्हेगारास सराईत असून या कटातील मुख्य सूत्रधार पैकी एक आहे.

त्यामुळे कंडारेला अकरा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी. आरोपीच्या घरातून सापडलेले साडेनऊ लाख रुपये व दागिन्यांना बाबत देखील माहिती विचारायची आहे, असाही मुद्दा ऍड. चव्हाण यांनी मांडला. त्यावर न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली. कंडारेला आता ९ जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज