बीएचआर प्रकरण : जितेंद्र कंडारेची कारागृहात रवानगी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२१ । शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्या प्रकरणी अटक असलेले बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याला शनिवारी न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी करण्यात आली.

कंडारेविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात २५ डिसेंबर रोजी जामीन मिळाला तर २५ रोजी त्याला शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केली. संतोष काशीनाथ कांबळे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी बीएचआरमध्ये ठेवलेली १८ लाख ७ हजार १५९ रुपये परत मिळालेले नाहीत. दरम्यान, या गुन्ह्यात सुरूवातीला त्याला पाच व नंतर चार अशा एकुण नऊ दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली.

यात काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी मिळवले. शनिवारी कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायाधीश एस.एस. गोसावी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. सरकार पक्षातर्फे ऍड. प्रवीण चव्हाण यांनी काम पाहिले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar