fbpx

बीएचआर प्रकरण : ९ संशयितांच्या जामिनावर १ जुलैला कामकाज

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२१ । बीएचआर घोटाळाप्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या प्रेम कोगटा, भागवत भंगाळेसह ११ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आज ९ संशयितांच्या जामिनावर कामकाज झाले असता १ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. 

बीएचआर प्रकरणात १७ जून रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणाहून १२ जणांना अटक केली होती. या सर्व संशयित आरोपींनी ३० टक्क्याप्रमाणे पावत्या विकत घेतल्याने बीएचआर पतसंस्थेत विशिष्ट प्रकारे संगनमत करून घोटाळा करण्यात आला आहे.

यामुळे ठेवीदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे सर्व संशयितांना पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, ९ संशयितांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जामिनावर आज कामकाज झाले असते १ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

यांना केली होती अटक

अटक केलेल्यांमध्ये भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे, प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद) जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम रामनारायण कोगटा, प्रमोद किसनराव कापसे (अकोला) यांचा समावेश होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज