fbpx

भोकरी नदीवरील मंगरूळ लघुसिंचन प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या आठवड्यापासून पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत आहे. तर रविवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील काही धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. 

दरम्यान, सातपुड्याच्या कुशीतील भोकरी नदीवरील मंगरूळ लघुसिंचन प्रकल्प पावसाने भरून वाहू लागला आहे. या प्रकल्पातील पाणी सांडव्यावरून नदीपात्रात येत असून, परिसरातील नदीपात्र खळाळून वाहत आहे. यंदाच्या पावसाळ्यात ओसंडून वाहणारा हा जिल्ह्यातील पहिलाच मध्यम सिंचन प्रकल्प आहे.  

सातपुड्याच्या पट्ट्यात आणि मध्य प्रदेशातील या नदीच्या उगमस्थळी पाऊस झाल्याने हा प्रकल्प आता १०० टक्के भरून ओसंडून वाहू लागला आहे. मंगरूळ लघुसिंचन प्रकल्पात एकूण ६.४१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा क्षमता असलेला हा प्रकल्प आणखी काही काळ असाच भरून वाहिला तर पंधरा दिवसांत त्याचे पाणी मुखापर्यंत पोहचेल. 

या गावांना होतो फायदा?

यामुळे मंगरुळ, पिंप्री, केऱ्हाळा बुद्रुक, केऱ्हाळा खुर्द, भोकरी, अहिरवाडी, कर्जोद, तामसवाडी, वाघोड, पुनखेडा, बोरखेडा, पातोंडी आदी गावांना त्याचा फायदा होणार आहे. या गावांतील भूगर्भातील पातळी वाढून तेथील विहिरी कूपनलिकांची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज