fbpx

यंदाच्या पावसाची स्थिती कशी असणार? भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, वाचा काय आहे?

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । दरवर्षी भेंडवळ घटमांडणी संपूर्ण वर्ष कसं जाईल याची भविष्यवाणी करत असते. यंदाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यंदाचं वर्ष कसं असणार यावर भाकित वर्तवण्यात आलं आहे.  त्यानुसार यंदा पाऊस हा सर्वसाधारण राहणार असून देशावर, महामारी आणि आर्थिक संकट येणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे.

गेल्या 350 वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे भविष्यवाणी वर्तवण्यात येते. देशासह राज्यातील पाऊस, शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणाऱ्या भेंडवळची भविष्यवाणी आज 15 मे रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केली.

mi advt

त्यानुसार यावर्षी भेंडवड घटमांडणी चे भाकितानुसार पर्जन्यमान कमी सांगितले असून जून महिन्यात कमी पाऊस येईल. सार्वत्रिक पाऊस होणार नाही.  जुलै महिन्यात सार्वत्रिक आणि चांगला पाऊस पडेल. या महिन्यात अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत. तर ऑगस्ट महिन्यामध्ये जून-जुलै पेक्षा कमी पाऊस पडेल. आणि सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी पाऊस सांगितला आहे. यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती ची शक्यता वर्तविली आहे. आणि पीक परिस्थिती साधारण राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.

यंदा अवकाळी पावसाचे प्रमाणही कमी राहील. तर प्रचंड चाराटंचाई निर्माण होईल. त्यामुळे पशुधन संकटात येईल. पृथ्वीवर अनेक संकटे येतील. त्यामध्ये नैसर्गिक संकटे, रोगराई, परकीय घुसखोरी, अतिवृष्टी सारख्या आपत्तीला देशाला तोंड द्यावे लागेल.

देशाचा राजा कायम राहील मात्र त्याला प्रचंड संकटांचा सामना करावा लागेल. आर्थिक परिस्थिती अतिशय ढासळलेली राहील. तर राजकीय परिस्थितीही अस्थिर असेल. नैसर्गिक संकटांमध्ये जीवित हानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता सांगितली आहे.  अशाप्रकारे भेंडवड घटमांडणी चे भाकीत जाहीर करण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज