भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक; एक ठार, तीन जखमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । ट्रान्सपोर्ट नगरजवळील महामार्गावर भरधाव ट्रकने दोन दुचाकींना धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या ३० वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.यात तीनजण जखमी झाले आहे.

सविस्तर असे की, शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारा रवी गणेश बोरसे (वय-३०) हा तरूण गॅरेजवर काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. त्यासोबत त्याचा मित्र योगेश जगन्नाथ पाटील (वय-३६) रा. एमआयडीसी, जळगाव हा देखील गॅरेजवर काम करतो. दोन्ही वेगवेगळ्या गॅरेजवर काम करत असल्याने दोघांची ओळखत होते. दरम्यान रविवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी योगेश पाटील हा त्याची दुचाकीने ट्रान्सपोर्टनगर कडून येत असतांना रवी बोरसे हा कालींका माता मंदीराजवळ योगेशच्या दुचाकीवर बसून शहराकडे येण्यास निघाले.राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीचा मागून जोरदार धडक दिली. या अपघ्ज्ञातात दुचाकीवर मागे बसलेला रवी बोरसे या तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक योगेश हा किरकोळ जखमी झाला. शिवाय याच्या दुचाकीच्या बाजूला अजून एका दुचाकीला देखील ट्रकने धडक दिली. यात देखील इतर अनोळखी दोन जखमी जखमी झाले आहे. अपघात घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. मयत रवी बोरसेच्या पश्चात आई सुमन, वडील गणेश नामदेव बोसरे, अक्षय, मनोज व पियूष हे तिन भाऊ असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar