fbpx

कोरोनात निराधार झालेल्यांना ‘भरारी’ देणार रोजगाराच्या संधी, संपर्क साधण्याचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । कोरोना काळात अनेकांनी आपले पालक गमावले तर अनेकांच्या घरातील कर्ता स्त्री-पुरुष निघून गेले. डोळ्यांसमोर अंधार उभा राहिलेल्या अशा कुटुंबातील स्त्रिया,पुरुष, मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भरारी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. जिल्हाभरातील विविध संस्था, आस्थापना व कंपन्यांच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली जाणार असून संपर्क साधण्याचे आवाहन भरारीचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी केले आहे.

कोरोनाकाळात अनेकांनी जगाचा निरोप घेतला. काहींनी आपले पालक गमावले तर काहींच्या कुटुंबाचा कर्ता व्यक्ती निघून गेला. उद्याच्या भविष्याची चिंता अशा कुटुंबांना भेडसावत असून पुढे काय? हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. कोरोनात निराधार व बेरोजगार झालेल्या कुटुंबांना आधार देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भरारी फाउंडेशनतर्फे एक अभियान हाती घेण्यात आले आहे.

mi advt

जिल्हाभरातील नामांकित संस्था, कंपन्या व आस्थापनांना सोबत घेऊन त्यांच्याशी समन्वय साधत भरारी फाउंडेशनतर्फे जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. भरारीच्या या अभियानात रोजगाराच्या संधी शोधत असलेल्या कुटुंबांनी संपर्क साधावा असे आवाहन के.के.कॅन्सचे संचालक रजनीकांत कोठारी,स्पार्क इरिगेशनचे रवींद्र लढ्ढा,लक्ष्मी एग्रोचे बाळासाहेब सूर्यवंशी नवरंग चहाचे अमर कुकरेजा,उद्योजक सपन झुनझुनवाला व दीपक परदेशी यांनी केले आहे. आपल्या शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, कला कौशल्य विषयक माहिती घेऊन भरारी फाऊंडेशन, पत्ता पहिला माळा, नटवर प्लाझा, नवीपेठ, जळगाव किंवा 8830853069, 9420942042,7719004783 या मो.क्रमांकावर संपर्क साधावा असे त्यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज