अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या (U G C.) सचिव पातळीवरील बैठकीचे यश
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । दिल्ली येथील विश्व विद्यालय अनुदान आयोग (U.G C ) कार्यालयात मागील महिन्यात अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने कल्पना पांडे व प्रा. डॉ. नितीन बारी, अध्यक्ष एन-मुक्ता तथा प्रदेश उपाध्यक्ष अ.भा.रा.शैक्षिक महासंघ याच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यातील प्राध्यापकांच्या एम फिल,पी एचडी , संदर्भातील तफावती,पदोन्नती, न्यायालयीन प्रकरणे, प्राध्यापकांवर होणाऱ्या अन्याय संदर्भातील सर्व विषयांसंदर्भात नियोजित बैठक विद्यापीठ अनुदान आयोगाचे सेक्रेटरी प्रोफेसर रजनीश जैन यांच्या उपस्थितीत झाली होती. शैक्षिक महासंघाच्या वतीने प्राध्यापकांच्या संदर्भातील सर्व सूचनांचा आम्ही आदर करतो कुठल्याही प्राध्यापकांचे नुकसान होणार नाही या दृष्टिकोनातूनच विश्व विद्यालय अनुदान आयोग काम करीत आहे व या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय विश्व विद्यालय अनुदान आयोग घेईल व दोन आठवड्यात या संदर्भातील पत्र प्रसिद्धीला दिले जाईल असे आश्वासन प्रोफेसर डॉ. रजनीश जैन यांनी शिष्टमंडळाला त्यावेळी दिले होते.
या संदर्भातील पत्र विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून नियमित मान्यता मिळालेल्या सर्व प्राध्यापकांना अहर्ता धारण केलेल्या दिनांकापासून सर्व लाभदायी आहेत असे या पत्राद्वारे यूजीसीने स्पष्ट केले आहे यामुळे लाभ घेतलेल्या एम फिल धारकांची अन्यायकारक वसुली थांबून लाभ न मिळालेल्या प्राध्यापकांना लाभ मिळवण्याकरिताचा मार्ग या पत्राद्वारे मोकळा झाला आहे.
याकरिता संघर्ष समिती सोबतच अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या सर्व प्राध्यापक कार्यकर्त्यांचे सर्व एम फिल नेट-सेटग्रस्त प्राध्यापकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून समविचारी प्राध्यापक या शिष्टमंडळामध्ये प्रा डॉ. पंढरीनाथ रोकडे, (औरंगाबाद ),प्रा. डॉ. अंकुश कदम (औरंगाबाद), प्रा. डॉ. संजय मगदूम, (कोल्हापूर ), प्रा. डॉ. निलेद लोखंडे.( मुंबई) प्रा डॉ शिंदे. प्रा.डॉ.राजकुमार नलगे (सोलापूर),प्रा. सुनील बावीस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.