fbpx

निवडणुकीच्या आधी भुसावळात १०० गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई होणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । भुसावळात शहरात वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेता आगामी पालिका निवडणुकीच्या आधी जवळपास १०० गुन्हगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे अनेक गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती कायदा १९९१ या कायद्यानुसार शहरात १०० जणांवर कारवाईचे पोलिसांचे नियोजन आहे. यासाठीच्या हालचाली देखील प्रशासकीय पातळीवर सुरु असल्याचे कळते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज