⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जामनेर | ऊसतोड कामगारांकडून ठेकेदारालाच मारहाण; सात मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल

ऊसतोड कामगारांकडून ठेकेदारालाच मारहाण; सात मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ डिसेंबर २०२१ । गेवराई ( ता. जामनेर ) येथील ऊसतोड कामगारांनी ठेकेदाराकडील पैसे हिसकावून सोबत आलेल्या लोकांनाही मारहाण व शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना बुधवारी रोजी दुपारी घडली. याप्रकरणी गुरुवारी पहूर व शेंदुर्णी येथील सात ऊसतोड मजुरांविरुद्ध पहूर पोलिसा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फकीरा तुकाराम हातागळे (४८ रा. गलवाडा ता. गेवराई) असे या ऊसतोड ठेकेदाराचे नाव आहे. तर अहमद महमद तडवी (३०), कलीम सलीम तडवी (२७), फकीरा आमीर तडवी (४०), गुलाब अब्बास तडवी (४०), सांडू मेहताब तडवी (४५), बशीर मेहताब तडवी (३२, रा. पहूर ता. जामनेर) व शरीफ सिकंदर तडवी (रा. शेंदुर्णी ता. जामनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या ऊसतोड कामगारांची नावे आहेत.

घटनेच्या माहितीनंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरविण्यास सुरूवात केली आहे काही ठिकाणी जाबजबाब घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

कामगाराजवळ दिले चार लाख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदार फकीरा हातागळे यांनी या ऊसतोड कामगारांना चार लाख रुपये दिले व आणलेल्या टेम्पोमध्ये सोबत येण्यास सांगितले. या कामगारांनी सोबत जाण्यास नकार देत ठेकेदार याच्याशी वाद घातला आणि त्याच्याजवळ असलेल्या बॅगमधील ५० हजार रुपयाची रोकड़ जबरीने हिसकावून घेतली. एवढेच नाही तर ठेकेदार व त्याच्यासोबत आलेल्या लोकांनाही मारहाण व शिवीगाळ करून दमदाटी करीत पळवून लावले. या प्रकरणी पहूर पोलिसात ठेकेदार फकीरा हातागळे यांनी फिर्याद दिली. त्यावरून वरील सातही जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे करीत आहेत.

 

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.