fbpx

वृद्धाला मारहाण करणाऱ्यांकडून मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२१ । शहरातील महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ ट्रकने वळण घेत असलेल्या वृद्धासोबत दुचाकीवर जात असलेल्या तीन तरुणांचा शाब्दिक वाद झाला. वाद वाढत असताना त्या ठिकाणाहून जात असलेल्या एका दुचाकीस्वार तरुणाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्या तरुणांसह इतरांनी त्याला बेदम मारहाण केली.

रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ रात्री ८.३० च्या सुमारास वळण एक वयोवृद्ध चालक ट्रकने वळण घेता होते. त्याचवेळी ३ दुचाकीस्वार तरुण हॉर्न वाजवीत असल्याने वृद्धाने त्यांना थांबण्यास सांगितले. तरुणाचा व वृद्धाचा शाब्दिक वाद सुरू असताना दुचाकीने जात असलेला आबीद शेख गफ्फार वय-३० रा.मुस्लीम कॉलनी याने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता तरुणांनी त्यास बेदम मारहाण केली. तरुणाला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि एमआयडीसी पोलिसांनी भेट दिली असून याप्रकरणी अद्याप पोलिसात नोंद नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज