पाणी सोडण्यासाठी गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यास मारहाण

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील शिवाजीनगर भागातील हुडको येथे पाणी सोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या वॉलमनला दोघांनी मारहाण केल्याची घटना मंगळवार दि.२ रोजी घडली. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात उमाकांत संभाजीराव चव्हाण (वय-५८,रा. पिंप्राळा) हे वॉलमन म्हणून कार्यरत आहेत. ते मंगळवार दि.२ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी (एम.एच.१९, बी.के.७०८९) ने शिवाजीनगर हुडको येथे पाणी सोडण्यासाठी जात असतांना जर्नादन कोळी व गणेश (पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांनी त्यांना अडवून ‘तु पाणी लवकर सोड’ असे म्हणत मारहाण केली. यावेळी चव्हाण दुचाकीरुन उतरले असता, त्या दोघांनी दुचाकीचीही तोडफोेड केली. दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या चव्हाण यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती त्यांचे शाखा अभियंता सुनील तायडे यांना दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जगदीश मोरे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज