केळीच्या खोडमागे लपवून गोमांस तस्करी, जळगावात आयशर पकडला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । सावदा येथून मुंबईला गोमांस घेऊन जाणारा आयशर रात्री ११.४५ च्या सुमारास जळगावातील कालिंका माता चौकात पकडण्यात आला. केळीच्या खोड आणि पानांमागे प्लास्टिक टाकीत लपवून मांस तस्करी केली जात होती. घटनास्थळी मोठा जमाव जमला असून पोलिसांनी धाव घेतली आहे.

सावदा येथून मुंबईला गोमांस घेऊन जाणारा आयशर रात्री ११.४५ च्या सुमारास जळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कालिंका माता मंदिर चौकात महामार्गावर पकडला. संशय आल्याने काही गोरक्षक भुसावळपासून या आयशरचा पाठलाग करीत होते. गोरक्षकांनी वाहन थांबविताच चालक आणि क्लिनर पळ काढत होते. जमावाने चालकाला पकडून शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

वाहनात प्लास्टिक टाकीत मांस भरून त्यावर केळीचे पान आणि खोड झाकलेले होते. केळीचे उत्पादन किंवा इतर साहित्य त्यातून नेले जात असेल असा अंदाज येत होता मात्र टाकीत मांस आढळून आल्याने सर्वांचा संताप झाला. ट्रक जळगावात एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी भेट दिली आहे. नगरसेवक प्रवीण कोल्हे यांच्यासह काही नागरिक, शनीपेठ, एमआयडीसी पोलिसांनी शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -