पाकिस्तानातील केळी निर्यातबंदी उठवावी : केळी उत्पादकांची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसोबत केळी व अन्य शेतमाल निर्यात-आयात बंद केली आहे. दरम्यान, बंद असलेला व्यापार पुन्हा सुरू करून केळी व अन्य शेतमाल निर्यात-आयात करण्यास केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी सावदा परिसरातील केळी उत्पादक शेतकरी करू लागले आहेत.

देशात जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी अग्रेसर मानला जातो. जिल्ह्यात ४५ ते ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर केळीचे उत्पादन घेतले जाते. देशात व परदेशात केळी निर्यातदार म्हणून जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन अपेडाच्या माध्यमातून केळी परदेशात निर्यातीला सुरुवात केली.

संपुर्ण जिल्ह्याची केळीची मुख्य बाजारपेठ देशाच्या उत्तर भागात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्या बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागते. दरम्यानं पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तनासोबत  केळी व अन्य शेतमाल निर्यात-आयात बंद केली असून ते सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणे पुंछ व उरी रस्ते वाहतूक मार्गे शेतमालाची आयात-निर्यात सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी  करण्यात आलीय.  पूर्वीप्रमाणे पाकिस्तानात केळी निर्यात सुरू झाल्यास बाजार भाव स्थिर राहण्यास मदत होईल. याचा स्थानिक केळी उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज