fbpx

बास्केटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये पाचोरा तर मुलींमध्ये धुळे संघ विजयी

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई यांच्या वाढदिवसा निमित्त शुक्रवार दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी युवासेना व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्र स्तरीय बास्केट बॉल स्पर्धेचे आयोजन जी. एच. रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, जळगाव येथे करण्यात आले होते.

जळगाव, धुळे, नंदूरबार या तिन जिल्ह्यातून 11 संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन युवासेना कोअर कमिटी सदस्या व मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सौ. शितलताई देवरूखकर शेठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्रीताई महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, युवासेना जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, शिवसैनिक विराज कावडीया, अमित जगताप, महिला जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, अस्मिता पाटील, महानगर प्रमुख शोभा चौधरी, शहर प्रमुख ज्योती शिवदे, युवासेना विस्तारक धनश्री कोलगे (मुंबई), सरिता माळी-कोल्हे, निलू इंगळे, आशा खैरनार, जी.एच. रायसोनी गृप चे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, संचालिका डॉ. प्रिती अग्रवाल, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, ललित धांडे, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख पियुष गांधी, जितू बारी, स्वप्नील परदेशी, यशश्री वाघ, वैष्णवी खैरनार, यश सपकाळे, जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुलांमध्ये प्रथम स्थान पाचोरा, द्वितीय चाळीसगाव व तृतीय स्थानावर धुळे संघ विजयी झाले तसेच मुलींमध्ये प्रथम धुळे, द्वितीय स्थान जळगाव संघाने पटकावले.

mi advt

स्पर्धेला जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन चे रविंद्र धर्माधिकारी, जितेंद्र शिंदे, दिनेश पाटील, आशिष पाटील, सचिन पाटील, विनय काळे, वाल्मिक पाटील, सोनल पाटील, वसिम शेख, जावेद शेख यांचे अनमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसैनिक विराज कावडीया, अमित जगताप, प्रितम शिंदे, पियुष तिवारी, राहूल चव्हाण, भूषण सोनवणे, सयाजी जाधव, दिनेश पाटील, योगेश वानखेडे, भटू अग्रवाल, विशाल तिवारी, अमोल सोनवणे, जितू बारी, पियुष गांधी, यश सपकाळे, अंकित कासार, तेजस दुसाने इत्यादिंनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज