जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । बिलाचे पैसे कमी करण्याच्या कारणावरून धमकी देत वृत्तपत्रात खोटी बातमी देवून बदनामी करण्यात आली तसेच प्रकरण मिटवण्यासाठी जळगावातील एका हॉस्पिटलच्या मालकास खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार शहरात घडला. या प्रकरणी नाचणखेडा येथील शोएब पटेल या संशयीताविरोधात खंडणीचा गुन्हा एमआयडीसी पोलिसात दाखल करण्यात आला.
शहरातील एमआयडीसी परीसरातील एका हॉस्पिटल मालकास 14 एप्रिल 2021 रोजी संशयित आरोपी शोहेब पटेल याने हॉस्पिटलच्या बिलाचे पैसे कमी करण्याचे सांगितले असता ते कमी न केल्याने धमकी देण्यात आली व 16 एप्रिल 2021 रोजी एका वृत्तपत्रात खोटी बातमी देवून रुग्णालयाची बदनामी करण्यात आली. त्यानंतर 23 एप्रिल 2021 रोजी हॉस्पीटल मालकाकडे दोन संशयीतांनी येत प्रकरण मिटण्यासाठी पाच लाख रुपयाची खंडणी मागितली. या प्रकरणी संशयीत आरोपी शोहेब पटेल (रा.नाचणखेडा) याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहेत.