पिंप्राळा येथे जुन्या वादातून बापलेकाला मारहाण; दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ नोव्हेंबर २०२१ ।  पिंप्राळा हुडको येथील सिध्दार्थ नगरात जुन्या भांडणातून तरूणासह त्यांच्या मुलाला दोन जणांनी दगडासह फरशीने मारहाण करुन दुखापत केल्याची घटना रविवारी रोजी घडली. राजेंद्र दिलीप शिरसाठ व राहूल युवराज सोनवणे असे मारहाण करणाऱ्यांचे नाव असून, याप्रकरणी अंकुश साळवे यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील आसोदा येथील मूळ रहिवासी  अंकुश धनराज साळवे ( वय ४० ) हे सद्य;स्थितीत सुरत येथील उधना येथे वास्तव्यास आहेत. रविवारी ते त्यांचा मुलगा विक्कीसह यांच्यासह पिंप्राळा हुडको येथील सिध्दार्थ नगरात आले होते. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरुन राजेंद्र दिलीप शिरसाठ रा. मुसळी ता. धरणगाव  व राहूल युवराज सोनवणे रा. सिध्दार्थ नगर, जळगाव या दोघांनी अंकुश साळवे यांच्यासह मुलगा विक्की यास शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.

यादरम्यान फरशी व दगडाने अंकुश साळवे यांच्यासह मुलगा विक्कीच्या डोक्यात मारहाण करुन दुखापत केली. यात दोन्हीही जखमी झाले आहेत. याप्रकरणी सोमवारी अंकुश साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राजेंद्र दिलीप शिरसाठ व राहूल युवराज सोनवणे या दोघांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्‍वर पाटील हे करीत आहेत.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज