भाजप आमदारांच्या दौऱ्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांचे बॅनर फाडले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । शहरातील स्टेट बॅक कॉलनीत आ.सुरेश भोळे यांनी पाहणी दौरा केल्यानंतर काही वेळातच भाजपच्या कार्यकर्त्याने शिवसेना नगरसेवकांनी रस्त्यांच्या कामासंबंधी लावलेले विकासाचे बॅनर फाडून फेकल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. बॅनर फाडणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याने या कार्यकर्त्या विरोधात आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी दिली आहे.

स्टेट बॅक कॉलनीत सोमवारी सकाळी आमदार सुरेश भोळे यांनी कार्यकर्त्यासोबत अचानक पाहणी दौरा केला. दौरा आटोपतच दुपारी भाजपच्या एका कार्यकर्त्याने शिवसेना नगरसेवक नितीन बरडे व बंटी जोशी यांनी परिसरात करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाबाबत ठिकठिकाणी लावलेले विकासकामांचे बॅनर फाडून फेकले.

आम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये बॅनर फाडणारा कैद झाला असून तो कोण आहे ते समजले आहे. याबाबत पोलिसात तक्रार देणार असल्याचे नितीन बरडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शिवसेना नगरसेवक चांगलेच संतप्त झाले आहेत.

बॅनर फाडणे भाजपची संस्कृती नसून मी या प्रकाराचा निषेध करतो. बॅनर फाडणाऱ्यावर कारवाई करावी, असे आ.सुरेश भोळे यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar