fbpx

ऑगस्ट महिन्यात १५ दिवस बँका बंद राहणार? जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । ऑगस्ट महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात सण उत्सव असलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस नेहमीपेक्षा जास्त आहेत. यामुळे या महिन्यात तब्बल १५ दिवस बँकांना सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकशी संबधित तुमचं काही काम असेल तर शक्यतो याच महिन्यात पूर्ण करा.

कोरोना काळात विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या. अन्यथा तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो.

ऑगस्ट महिन्यात एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. वेगवेगळ्या राज्यांत सुट्ट्यांचे दिवस वेगवेगळे असू शकतात. दर रविवारी तसंच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. याशिवाय प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात.

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची लिस्ट –

१ ऑगस्ट : रविवार

८ऑगस्ट : रविवार

१३ ऑगस्ट : पॅट्रियट टे- इंफाल मध्ये बँका बंद

१४  ऑगस्ट : महीन्याचा दुसरा शनिवार

१५ ऑगस्ट : रविवार

१६ ऑगस्ट : पारसी नववर्ष

१९ ऑगस्ट : मुहर्रम (अशूरा)

२० ऑगस्ट : मुहर्रम/फर्स्ट ओणम

२१ ऑगस्ट : थिरुवोणम- कोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद

२२ ऑगस्ट : रविवार

२३ ऑगस्ट : श्री नारायणा गुरु जयंती- कोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद

२८ ऑगस्ट : महीन्याचा चौथा शनिवार

२९  ऑगस्ट : रविवार

३० ऑगस्ट : जन्माष्टमी / कृष्ण जयंती

३१ऑगस्ट : श्री कृष्ण अष्टमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज