⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | सरकारी योजना | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता स्वप्नातील घर बांधणे झाले सोपे, ‘ही’ सरकारी बँक देतेय ५० लाखांपर्यंत कर्जाची सुविधा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता स्वप्नातील घर बांधणे झाले सोपे, ‘ही’ सरकारी बँक देतेय ५० लाखांपर्यंत कर्जाची सुविधा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२१ । नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी जबरदस्त सुविधा सुरू केल्या आहेत. बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी ‘स्टार किसान घर योजना’ नावाची विशेष कर्ज योजना आणली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना घरबांधणीपासून घर दुरुस्तीपर्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून शेतकऱ्यांना पुरेसा वेळही दिला जात आहे.

BOI ग्राहकांना लाभ मिळेल
बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना या विशेष योजनेचा लाभ मिळणार आहे. वास्तविक, ही योजना BOI ने फक्त त्यांच्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे.

50 लाखांपर्यंत कर्जाची सुविधा
ज्या शेतकर्‍यांना त्यांच्या शेतजमिनीवर त्यांचे फार्म हाऊस बांधायचे आहे किंवा सध्याच्या घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करायचे आहे, अशा शेतकर्‍यांनाच लाभ मिळेल. यामध्ये शेतकऱ्यांना 1 लाख ते 50 लाख रुपयांचे कर्ज 8.05 टक्के व्याजदराने मिळणार आहे. त्याची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना 15 वर्षांचा कालावधी दिला जाईल.

दुरुस्तीसाठी 10 लाखांच्या कर्जाची सुविधा मिळणार
बँक ऑफ इंडियामध्ये KCC खाते असलेले कृषी कार्यात गुंतलेले शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी शेतकऱ्यांना नवीन फार्म हाऊस किंवा घर बांधण्यासाठी 1 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा दिली जाणार आहे. दुसरीकडे, सध्याच्या घरात दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा मिळणार आहे.

ITR देण्याची गरज नाही
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेत शेतकऱ्यांना आयटी रिटर्न देण्याची गरज भासणार नाही. बँक ऑफ इंडियाच्या ‘स्टार किसान घर’ कर्ज योजनेशी संबंधित अधिक तपशील मिळवण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता. याशिवाय, तुम्ही जवळच्या BOI शाखेला देखील भेट देऊ शकता किंवा बँकेच्या टोल फ्री क्रमांक 1800 103 1906 वर संपर्क साधू शकता.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.