fbpx

पुढील १३ दिवस बँकांना सुट्ट्या ; बँकेत जाण्यापूर्वी वाचा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । तुम्हाला दररोज बँकेत कामानिमित्त ये-जा करावी लागत असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील बँका १३ दिवस बंद राहणार आहेत. मात्र, या १३ सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिल्या जाणार आहेत. तुमच्या बँक शाखेत जाऊन तुम्हाला काही काम करायचे असेल तर आधी सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट वाचणे गरजेचे आहे.

ऑक्टोबर २०२१ मध्ये बँकांना दिल्या जाणाऱ्या एकूण सुट्ट्यांची लिस्ट दिली जात आहे, जेणेकरून तुम्ही त्यानुसार तुमच्या कामाचे शेड्यूल करू शकाल आणि तुम्हाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. दुसरा शनिवार असल्याने ९ ऑक्टोबर रोजी देशभरातील बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. त्याचबरोबर रविवारच्या सुट्टीमुळे १० ऑक्टोबर रोजी देशभरातील बँका बंद राहतील. तुमच्या राज्यानुसार, कोणत्या दिवशी बँका बंद राहतील हे जाणून घ्या.

या शहरांमध्ये असतील बँकांना सुट्टी
दुर्गा पूजा महासप्तमीमुळे अगरतळा आणि कोलकाता येथील बँका १२ ऑक्टोबर रोजी बंद राहतील, १३ ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजा महाअष्टमीमुळे अगरतळा, कोलकाता, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, पाटणा आणि रांची येथे बँका बंद राहतील, १४ ऑक्टोबर रोजी दुर्गापूजा महानवमीच्या निमित्ताने अगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, लखनऊ, शिलाँग, श्रीनगर, तिरुअनंतपुरम, पाटणा आणि रांची येथे बँक सुट्टी असेल, १५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याला देशभरातील बँका बंद राहतील. मात्र, या दिवशी इम्फाल आणि सिमला येथील बँकां सुरु राहतील. दुर्गा पूजेमुळे १६ ऑक्टोबर रोजी गंगटोकमध्ये बँका बंद राहतील, १७ ऑक्टोबर रोजी रविवारच्या सुट्टीमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल, काटी बिहूमुळे १८ ऑक्टोबर रोजी गुवाहाटीच्या बँका बंद राहतील तर ईद-ए-मिलादमुळे १९ ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील. अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, इंफाल, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई, नागपूर, दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथील बँका या दिवशी बंद राहतील.

महर्षि वाल्मिकी जयंतीला आगरतळा, बेंगळुरू, चंदीगड, कोलकाता आणि शिमला येथील बँका २० ऑक्टोबर रोजी बंद राहतील, ईद-ए-मिलाद नंतर पहिला जुम्मा असल्याने २२ ऑक्टोबर रोजी जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँकेला सुट्टी राहील, त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार आणि २४ ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. जम्मू-श्रीनगरमध्येही २६ ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील. रविवारच्या सुट्टीमुळे देशभरातील बँका ३१ ऑक्टोबर रोजी बंद राहतील.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज