खासगीकरणाच्या विरोधात आजपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात दहा बँक कर्मचारी संघटनांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. आजपासून या संपाला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील बँक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहे. यामुळे सुमारे ९६० कोटी रूपयांचे व्‍यवहार ठप्‍प झाला आहे. मागण्या मान्य न झाल्यास बॅँका बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

याप्रसंगी युनायटेड फोरमचे जिल्हा समन्वयक अभिलाष बोरकर, दत्तात्रय चौधरी, प्रताप पाटील, रफिक पिंजारी, धनंजय गावंडे, मोहन खेवलकर, निलेश काळे, विकास कल्याणी, जी.पी. जावरे, अमोल तांगडे यांच्यासह आदी जिल्ह्यातील सरकारी बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

संप कशासाठी ? 

सरकारी बँकांच्या खासगीकरणाला बँक संघटनांचा तीव्र विरोध आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रांना गंभीर परिणामांना सामारे जावे लागेल. ग्रामीण भागातील कर्ज वितरणावर थेट परिणाम होण्याची भीती बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी वर्तविली आहे. तसेच बँकांचे खासगीकरण झाल्यास ग्राहकांनी बँकेत ठेवलेल्या ठेवींच्या जोखमीमध्ये देखील वाढ होईल, असे या संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळेच बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी आजापासून दोन दिवसीय संप पुकारला आहे.

 

 

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -