fbpx

तांदलवाडी येथून २० मेट्रिक टन केळीचा कंटेनर दुबईला रवाना

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे. रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथून 20 मेट्रिक टन केळीचा एक कंटेनर नुकताच दुबईला रवाना झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.

तांदलवाडी येथील प्रगतशील शेतकरी प्रशांत महाजन यांनी पहिल्यांदा जीआय मानांकित केळीची परदेशात निर्यात केली आहे. आतापर्यंत या गावातील केळीची परदेशात निर्यात होत होती. मात्र, जीआय मानांकन या टॅगखाली पहिल्यांदा केळीची निर्यात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.

mi advt

ॲग्रिकल्चर अँड प्रोसेसस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटी म्हणजेच ‘अपेडा’ने पुढाकार घेतल्याने आम्हाला जीआय मानांकित केळी दुबईला पाठवता आली. अपेडाने मध्यस्थी करत गुजरातमधील नवसारी येथील देसाई ॲग्री फूड्स नावाच्या कंपनीशी आमचा संवाद साधून दिला. त्यातून 20 मेट्रिक टन जीआय मानांकित केळी ट्रकने मुंबईला नेण्यात आली. तेथून जेएनपीटी बंदरावरून थेट दुबईला निर्यात करता आली, असे प्रशांत महाजन यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज