fbpx

माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांना पितृशोक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । चोपडा येथील माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे वडील तथा विद्यमान आमदार लताताई सोनवणे यांचे सासरे बळीराम सोनवणे यांचे शुक्रवारी निधन झाले.

बळीराम दादा सोनवणे हे शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले एक व्यक्तिमत्व होते. उत्कृष्ट कबड्डीपटू, प्रगतशील शेतकरी आणि यशस्वी राजकारणी अशी त्यांची ओळख होती. सितारामदादा सोनवणे यांच्याकडून कबड्डीचे धडे गिरवत बळीराम सोनवणे हे कबड्डीपटू म्हणून राज्यभर प्रसिद्ध होते. नियमित व्यायाम केल्यामुळे ते आजही धडधाकट होते. मध्यंतरी काँग्रेसमध्ये ते सक्रिय झाले होते. काही वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद देखील त्यांनी भूषविले होते. बळीराम सोनवणे यांचे शुक्रवारी निधन झाले.

कै.बळीराम तोताराम सोनवणे (वय ८५) यांची अंत्ययात्रा राहते घर जयकिसन वाडी येथून उद्या वैकुंठधाम, नेरी नाका स्मशानभूमी येथे जाणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज