कत्तलखान्यात जाणाऱ्या गुरांचे प्राण बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाचविले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । लोहारा ( ता.पाचोरा ) येथे‎ कत्तलीसाठी टेम्पाेतून नेण्यात‎ येणाऱ्या सहा गुरांचे प्राण बजरंग ‎दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे ‎वाचले. दरम्यान, गुरांची सुटका करून‎ वरखेडी येथील महावीर गाे शाळेत ‎रवाना करण्यात आले असून, अंदाजित ३ लाख‎ ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल‎ जप्त केला. या प्रकरणी ‎पिंपळगाव हरेश्वर पाेलिसात ‎दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.‎

सविस्तर असे की, लाेहारा गावाबाहेर रस्त्यालगत‎ ४०७ टेम्पो उभा होता. त्यातून‎ अमानुषपणे बांधून गुरांची वाहतूक‎ होताना बजरंग दलाचे संयोजक‎ महेंद्र घोंगडे व आप्पा चौधरी यांना‎ दिसले. दरम्यान,गुरे कत्तलीसाठी नेत‎ असल्याचे निदर्शनास आल्याने‎ बजरंग दल कार्यकर्त्यांनी वाहन‎ चालक ( मुजाहिद रफीक शेख,रा.‎मुल्लावाडा, पाचोरा ) व (आबिद खान अकमल‎ खान,रा. इस्लामपूर,चाळीसगाव )‎ यांना विचारपूस केली. त्यांनी‎ ‎उडवा उडवीची उत्तर दिल्याने शंका‎ बळावली. महेंद्र घोंगडे यांनी लोहारा‎ येथील हेमंत गणेश गुरव यांना‎ फोनवरून घटनेची माहिती दिली.‎ त्यांनी गाडी लोहारा दूर क्षेत्र पोलिस‎ ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले.‎ हेमंत गुरव यांनी तत्काळ पिंपळगाव‎ हरेश्वर पोलिस ठाण्याचे सहाय्यक‎ पोलिस निरीक्षक कृष्णा भोये,‎ चाळीसगाव विभागाचे पाेलिस‎ उपअधीक्षक रमेश चोपडे, पाचोरा‎ उपविभागीय पोलिस उपअधीक्षक‎ भारत काकडे यांच्याशी संपर्क‎ करून याबाबत सविस्तर माहिती‎ दिली. त्यांच्या सूचनेनुसार गुरांची‎ ‎गाडी पिंपळगाव हरेश्वर पोलिस‎ ठाण्यात आणली. तेथे गाडी व‎ गुरांचा पंचनामा करून जप्त केले.‎

वाहनाची अंदाजित रक्कम २ लाख‎ ७५ हजार व ९२ हजार रुपये‎ किमतीची गुरे असा एकूण ३ लाख‎ ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल‎ जप्त करून गुन्हा दाखल करण्यात‎ आला. सुटका झालेली सहा गुरे‎ वरखेडी येथील महावीर गाे शाळेत‎ रवाना केले. पोलिस ठाण्याचे‎ गोपनीय शाखेचे पोलिस नाईक‎ अरुण राजपूत यांच्या फिर्यादीवरून‎ गुन्हा दाखल केला. तपास पोलिस‎ हवालदार अरविंद मोरे करत आहेत.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -