बजरंग बोगद्याचा लोखंडी बार पुन्हा कोसळला

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । शहरातील बजरंग बोगदा शेजारी नव्याने बांधलेल्या रेल्वे बोगदा बाहेर लावलेला क्रॉसबार पुन्हा एकदा कोसळला आहे. काही महिन्यांपूर्वी देखील एका वाहनाच्या धडकेत साईड बार तुटला होता.

बजरंग बोगद्याशेजारील नवीन रेल्वे बोगद्यातून अवजड आणि मोठ्या वाहनांची वाहतूक होऊ नये यासाठी लोखंडी क्रॉसबार बसविण्यात आले आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास गणेश कॉलनीच्या दिशेने असलेला बार अचानक कोसळला.

सुदैवानं घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी वाहनधारकांची गैरसोय होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज