‘बैल पोळा’ बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज | मयुर घाडगे- पाटील | कृषीप्रधान भारताचा कणा आहे इथला बळीराजा … आणि बळीराजाचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे त्याचे सर्जा राजा,वर्षभरात शेतीकामात बैल शेतकर्याला खूप मदत करत असतो .दोघांचही रोजचं घाम गाळत असता . पोळा हा त्याच्या वर्षभरातील राबणुकीला विश्रांती देणारा हा दिवस ,त्याची अंघोळ होते पुजा होते या दिवशी, त्याला असं सजलेल पाहून शेतकर्याच्या चेहर्यावर ओसंडून वाहणारा आनंद हाच बैलासाठी खरा आनंद असतो ,बैल पोळा म्हणजे कृषी संस्कृतीचा मोठा ठेवा आहे .

 

यंदाच्या वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण असून त्यामुळे मोठ्या उत्सवात बैल पोळा साजरा झाला

 

बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा बैल पोळा हा एक सणअसून हा विशेषतः  महाराष्ट्र मोठ्या प्रमाणा वर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ग्रामीण भागात ज्यांच्याकडे शेती नाही ते बैल पोळ्याला मातीच्या बैलाची पूजा करतात.

भारतासारख्या शेतीप्रधान देशात, ग्रामीण संस्कृतीवर त्याचे सण उत्सव साजरी केले जाता त्यामुळे येथील शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. नागपंचमी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा बैल जोडीचा सण म्हणजे बैल पोळा.

 

शेतकऱ्यांसाठी सदैव कष्ट करणार्‍या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणाऱ्या पोळा सणाचे ग्रामीण भागात महत्व आहे .

 

महाराष्ट्राच्या काही प्रदेशात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैल पोळाला म्हणजे पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसर्‍या दिवसाला तान्हा पोळा असे म्हटले जाते.

 

काही भागात या सणाला बेंदूर उत्सव असे देखील म्हणतात.

 

सणा विषयी आख्यायिका

 

बैल पोळा या सणाविषयी एक आख्यायिका आहे, जेव्हा प्रभू विष्णू कृष्णाच्या रुपात धरतीवर आले होते तेव्हापासून कृष्णाचा मामा कंस भगवान कृष्णाचे प्राण घेण्याचा प्रयत्न करत होता. कंसाने अनेकदा कृष्णाचा वध करण्यासाठी असुर पाठवले होते. एकदा मामा कंसाने पोलासुर नावाचा राक्षस कृष्ण भगवान चा वध करण्यासाठी पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध करुन सर्वांना चकित केले होते तो दिवस श्रावण अमावस्येचा होता. म्हणून या दिवसाला पोळा असे म्हणू लागले.

 

पोळा अमावस्याच्या दिवशी येत असून याला पिठोरी अमावस्या म्हणून देखील साजरा करतात

 

सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दिवस बैला न ची पुजा करून नांगरापासून दूर ठेवले जाते.

या दिवशी त्यांना उटणे लावून मालीश करुन स्नान करवतात. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सजवलं जातं. त्यांना रंगबिरंगी वस्त्रांनी, दाग-दागिन्यांनी सजवण्यात येतं.बैल पोळा सणाच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घातली जाते. नंतर त्यांना चारा देऊन घरी आणतात.

तसेच त्यांच्या पाठीवर विविध नक्षीकाम केलेली झूल चढवतात, आणि सर्व अंगावर गेरूचे ठिपके देऊन, शिंगांना बेगड बांधतात.

काही शेतकरी आपल्या बैलाच्या पाठीवर रंगकाम करून त्याला सजवतात.डोक्याला बाशिंग बांधून, गळ्यात छुम छुम करणार्‍या घुंगरांच्या माळा घातल्या जातात.

 

सगळं काही नवीन , नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घातले जातात. बैलांना गोड पुरणपोळी चा नैवेद्य असतो. बैलाची निगा राखणाऱ्या घरगड्यास नवीन कपडे घेतले जातात.आणि मग गावात बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.

आपल्या भारत देशात प्रामुख्याने महाराष्ट्र,कर्नाटक या राज्यांच्या ग्रामीण भागात हा सण मोठ्या उस्साहात साजरा केला जातो. गावाकडील या सणाची मज्ज्या चं वेगळी आहे.

 

शिंगे घासली बाशिंगे लावली,

माढूळी बांधली मोरकी आवळली.

तोडे चढविले कासरा ओढला

घुंगरूंमाळा

वाजे खळाखळा

आज सण आहे बैलपोळा..

 

✍️ मयुर घाडगे पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -