बोरगाव-जामनेर बसमध्येच झाली प्रसूती, बाळाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । बोरगाव-जामनेर बसमध्येच महिलेची प्रसुती झाल्याची घटना शुक्रवारी घडली. दुर्दैवाने या घटनेत बाळाचा मृत्यू झाला. महिलेवर जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दगावलेले बाळ पुरूष जातीचे होते.

तालुक्यातील बोरगाव येथील लताबाई अशोल भिल्ल या महिलेस शुक्रवारी दुपारी अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या. त्यामुळे शेतात कामाला गेलेल्या कुटुंबियांनी घर गाठले. महिलेला बोरगाव येथून जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यासाठी कुटुंबिय बोरगाव-जामनेर बसमध्ये बसले. मात्र महिलेची बसमध्ये प्रसुती झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून चालक श्यामकांत पाटील यांनी उपजिल्हा रूग्णालयात आणली.

उपजिल्हा रूग्णालयाच्या गेटसमोर लागलेल्या हातगाड्या, उभ्या केलेल्या कार व दुचाकींमुळे बसला रुग्णालयात पोहोचताना विलंब झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत महाजन यांनी शुक्रवारी पुन्हा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी काही वाहनांवर कारवाई केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज