शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय ९९) यांची प्रकृती चिंताजनक असून रविवारी संध्याकाळी त्यांना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. सोशल मिडियात त्यांच्या मृत्यूची अफवा पसरत आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे दिवाळी आधीपासूनच ते आजारी असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दि.२६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सध्या न्यूमोनिया झाला असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्यावतीने विचारपूस करण्यात येत आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरविले आहे.

पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटीलेटरवर आहेत, अशी माहिती रुग्णालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सोशल मिडियात त्यांच्या मृत्यूची अफवा पसरविण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज