महाकृषी ऊर्जा अभियानाची चाळीसगावात जनजागृती

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियानाद्वारे दिली आहे. या अभियानाबाबत महावितरणतर्फे चाळीसगाव तालुक्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येत आहे.

सायगाव येथील ग्रामसभेत कृषिपंप पंप ग्राहकांना महावितरणच्या कृषी वीज धोरण-२०२० ची माहिती देण्यात आली. कृषी वीजबिल सवलत योजनेचीही सविस्तर माहिती देऊन प्रत्येक शेतकरी ग्राहकास सप्टेंबर-२०२० पासूनची चालू बिले भरण्याचे आवाहन करण्यात आले, असे उपकार्यकारी अभियंता बाविस्कर यांनी सांगितले. वाघळी १ व २ कक्षाचे कनिष्ठ अभियंता रावते यांनी वाघळी येथील ग्रामसभेत कृषिपंप ग्राहकांना कृषी वीज बिल सवलत योजनेची सविस्तर माहिती देऊन शेतकरी ग्राहकांना सप्टेंबर २०२० पासूनची चालू बिले भरण्याचे आवाहन केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -