डी.डी.राजपूत पुरस्काराने सन्मानित

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय आणि एन.एम.कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक दगा दौलत राजपूत यांना जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघद्वारा जिल्हास्तरीय क्रीडा जीवन गौरव आणि जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

या आधी त्यांना राष्ट्रपती व पंतप्रधान स्काऊट गाईड ढाल मिळालेली असून, नाशिक विभागीय स्तरावर उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार, तालुका क्रीडा समितीचा पुरस्कार, संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. क्रीडा क्षेत्रात थेट राज्य स्तरावर त्यांचे खेळाडू विद्यार्थी चमकलेले आहेत. या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, प्राचार्य, शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -