fbpx

अ‍ॅ‍ॅड. सुरज चौधरी यांची तेली महासंघाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी निवड

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । रावेर नगरपालिकेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक अ‍ॅ‍ॅड. सुरज चौधरी यांची प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव जिल्हा युवक जिल्हाध्यक्षपदी (ग्रामीण पूर्व विभाग) निवड करण्यात आली आहे.

अ‍ॅ‍ॅड. सुरज चौधरी यांच्या वाढदिवसाच्या दिनी प्रदेश कार्याध्यक्ष श्यामकांत ईशी यांनी त्यांच्यावर युवक जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी खासदार सुरेशभाऊ वाघमारे, विक्रांत चांदवडकर, सहसचिव ज्ञानेश्वर दुगुर्डे, विजय काळे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, कार्याध्यक्ष जयश्री अहिरराव, युवक आघाडी प्रदेश सहसचिव साई शेलार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

नियुक्ति पत्र देतांना प्रदेश कार्याध्यक्ष श्यामकांत ईशी जिल्हा अध्यक्ष सुनील चौधरी(धरणगाव) व मित्र परिवार उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज