आजाराला कंटाळून युवकाने संपविले जीवन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२१ । तालुक्यातील आव्हाणे येथील एका ४० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून अल्सरचा त्रास असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समजते.

आव्हाणे येथील गंगाधर योगराज पाटील वय-४० हे अविवाहित होते. ठेकेदारीचे काम करून ते कुटुंबाला हातभार लावत होते. रविवारी सकाळी राहत्या घरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार ९.३० पूर्वी उघडकीस आला. सीएमओ डॉ.अजय सोनवणे यांच्या खबरीवरून तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात भाऊ विलास व दोन बहिणी आहेत. मयत गंगाधर यांना दोन वर्षापासून अल्सरचा त्रास असल्याची माहिती त्यांच्या भावाने दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -