जप्त केलेल्या २० ब्रास वाळू साठयाचा १६ रोजी लिलाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे मोकळ्या जागेत आढळून आलेल्या २० ब्रास वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दि.१६ रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार सुचेता चव्हाण यांनी दिली आहे.

एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे एका मोकळ्या जागेत अवैधरित्या साठवलेली २० ब्रास वाळू आढळून आली होती. हि वाळू प्रशासनाकडून जप्त करण्यात आली होती. दरम्यान, या २० ब्रास वाळू साठयाचा मंगळवार दि.१६ रोजी सकाळी ११ वाजता लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रती ब्रास ४ हजार ७६ रुपये याप्रमाणे अपसेट प्राईस जिल्हाधिकारी यांच्याकडून निश्चित करुन देण्यात आली आहे.

लिलावात सहभागी होणाऱ्यांना बोलीपूर्वी २५% अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. शासकीय किमंतीपेक्षा जास्त बोली येईल ती उपस्थितांसमोर जाहीर करून पंचनामा करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुचेता चव्हाण यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज