धक्कादायक : जिल्हा कारागृहात बंदिवान महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२१ । नेहमी चर्चेत असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका ५० वर्षीय महिलेने जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये पंख्याला गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अनिता राजा चावरे असे महिलेचे नाव आहे.

अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यासोबत बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न केले तसेच तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात अनिता चावरे या न्यायालयीन कोठडीत असताना कारागृहातील बॅरेक क्र. २ मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता चावरे यांनी सोमवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास साडीचा पदरचा काठ कापून बॅरेकमधील पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने दुर्घटना टळली. दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न का केला त्याचे कारण कळू शकलेले नाही.

याप्रकरणी जिल्हा कारागृहातील महिला कर्मचारी उषा मुरलीधर भोम्बे यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस स्थानकात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनिता चावरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -