कोळवद येथील 17 वर्षीय मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२१ । यावल तालुक्यातील कोळवद येथील 17 वर्षीय मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार, 6 रोजी सकाळी उघडकीस आली. तिला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.

कोळवद येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलीने शनिवारी सकाळी संतापाच्या भरात घरातील विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला, अधिपरीचारिका जॉन्सन सोरटे आदींनी प्रथमोपचार केले. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज