अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार, चौघांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली. तसेच त्यास सहकार्य करणाऱ्या महिला व अन्य दोन जणांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश रमेश बेडवाल (वय २२, रा. भिलदरी, ता कन्नड, जि. औरंगाबाद) हा ५ नोव्हेंबर २०२१ रोजी पीडित अल्पवयीन मुलीस पळवून घेऊन गेला होता व त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला औरंगाबाद येथून अटक केली. मुलीला पळून नेण्यास मदत करणारा व यांना आश्रय देणाऱ्या अजय रमेश बेडवाल (वय १९, रा. टिटवाळा मांडा) याला टिटवाळा येथून अटक केली. तर अल्पवयीन मुलीस पळून नेण्यास मदत करणारी महिला काजल बन्सीलाल मोची (वय २९) हीस डांभुर्णी येथून ५ रोजी अटक केली. तर जय हरिचंद वाघ (वय २९, रा. कोलवाडी ता कन्नड) यास ५ रोजी अटक केली.

अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचे कामी तसेच त्यांना आश्रय व मदत केल्याने न्यायालयीन कोठडी ठेवले आहे. तपास सपाेनि कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनात फौजदार दिगंबर थोरात करत आहे. त्यांना शिवनारायण देशमुख, रवींद्रसिंग पाटील, विजय माळी, संभाजी सरोदे, योगिता चौधरी यांनी मदत केली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -