दीपनगर प्रकल्पात भंगार चोरीचा प्रयत्न, दोघांनी काढला पळ

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । भुसावळ येथील दीपनगरात २१० प्रकल्पात सुरक्षा रक्षकांना दोन जण भंगार चोरी करताना दिसून आले असता. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आधीच चोरटे दुचाकी साेडून पळून गेल्याची घटना रविवारी रात्री ११.३० वाजता घडली. या प्रकरणी प्रकल्पाचे कनिष्ठ सुरक्षा अधिकारी कुणाल वाघोदे यांच्या तक्रारीवरून येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

संशयित नशीरशहा जनाबशहा (रा.फेकरी) व संजय रामचंद्र मुंदडा (रा.झेडटीएस, फेकरी शिवार, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. वाघोद हे २ जानेवारीला ड्युटीवर असताना गॅस गोदामात चोरी होत असल्याची माहिती त्यांना सुरक्षा रक्षकांनी दिली. त्यांनी ड्युटी अधिकारी राजेश तळेले यांच्यासह मिळालेल्या माहितीवरून गाेदामाकडे धाव घेतली. यावेळी वरील दोघे चोरटे दुचाकी (एमएच.१९.डीए.४७४०) सोडून पसार झाले. घटनास्थळी सुमारे ४ हजार रुपये किमतीच्या अ‍ॅल्युमिनिअम केबल ट्रेसह अन्य साहित्य मिळून आले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar