वाघोदा येथील चोरीच्या म्हशी खामगावच्या बाजारात विक्रीचा प्रयत्न; चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथून म्हशींची चोरी करून खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथील गुरांच्या बाजारात विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना खामगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या म्हशीसह एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.

सावदा येथून जवळच असलेल्या मोठा वाघोदा येथे दि.१३ रोजी रात्री किशोर सीताराम महाजन यांच्या मालकीच्या २ म्हशी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सावदा पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याबाबत तपास सुरु असताना खामगाव (जिल्हा-बुलढाणा) पोलिसांना गुरांचे बाजारात काही इसमांनी चोरीच्या म्हशी विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या चारही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सुरवातीला उड़वाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली.

किरण उर्फ राजू गोपाल कोळी, दिपक बाळु वाघ, गोविंद सुशील वाघ, (सर्व रा. वाघोदा बु, ता.रावेर) व संजय उर्फ पिंटू पंढरीनाथ बावचे (रा.रेल्वे स्टेशन, वाघोदा बु) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्याकडून ८५ हजार रुपये किमतीच्या म्हशी व ३ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ३ लाख ८५ हजार रुपये

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज