fbpx

धक्कादायक : ७२ वर्षीय वृद्धाकडून सहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न, गुन्हा दाखल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२१ ।  एका ७२ वर्षीय वृद्धाने सहावर्षीय बालिकेस फूस लावून घरात बोलावले व तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार  यावल तालुक्यातील अंजाळे येथे घडला.  यामुळे भयभीत झालेल्या बालिकेने आरडाओरड करून पळत घर गाठले. २ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा चाइल्ड हेल्पलाइनच्या माध्यमातून उलगडा झाल्याने शनिवारी येथील पोलिसांत पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील अंजाळे येथे माहेरी विवाहिता मुलाबाळांसह आली होती. २ ऑगस्ट रोजी विवाहिता तिच्या आई-वडिलांसोबत भुसावळला गेली होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास बालिका घराबाहेर खेळत होती. तेव्हा गावातील ७२ वर्षीय वृद्ध विश्वनाथ हरी तायडे याने त्या बालिकेस फूस लावून त्याच्या घरात बोलावले व तिच्याशी अश्लील चाळे केले. काही वेळाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याने ही बालिका प्रचंड घाबरली व ओरडून बाहेर पळाली. बालिका तिच्या आजोबाच्या घरी गेल्याचे पाहून विश्वनाथ तायडे यानेही घरातून पळ काढला.

इकडे बालिकेने हा प्रकार आईला सांगितला. परंतु बदनामी होईल म्हणून कुटुंबीयांना गप्प राहण्यास सांगितले. ३ ऑगस्ट रोजी पीडित बालिकेस घेऊन तिची आई सासरी निघून गेली. शनिवारी चाइल्ड हेल्पलाइनचे जिल्हा समन्वयकांनी या बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर रात्री या प्रकरणी यावल पोलिसांत बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज