fbpx

भांडण सोडविणे आले अंगाशी, एकावर चाकूने हल्ला

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ । यावल येथील स्वामिनारायण नगरात दोघांमधील भांडण सोडविण्यात गेलेल्या एकावर काठीने मारहाण करत त्याच्यावर चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना घडली.  याप्रकरणी पाच जणांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील स्वामिनारायण नगरातील रहिवासी राहुल संजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वृत्त असे की, शहरात  उमेश घारू व भारत धर्मा घारू यांचा दुचाकीचा कट बापू महाजन  यास लागल्यावरून बापू महाजन यांच्यासोबत भांडण सुरू होते ते  सोडविण्याचा प्रयत्न केल्याने अमर जगू घारू व उमेश जगू घारू यांनी त्यांचे दोन्ही हात धरून धर्मा जगू घारू याने पोटात बरगडीजवळ दुखापत केली, तर करण उमेश घारू व भारत धर्मा घारू यांनी हातात काठ्या घेऊन राहुल यांचा चुलत भाऊ एकनाथ दुर्गादास चव्हाण तसेच महेंद्र दुर्गादास चव्हाण व चुलते दुर्गादास गणेश चव्हाण अशांना काठ्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अमर घारू, उमेश घारू, धर्मा घारू, करण घारू व भारत घारू  या पाच जणांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mi advt

याचबरोबर दुसऱ्या फिर्यादी नुसार राहुल संजू चव्हाण, संजू गणेश चव्हाण, दुर्गादास गणेश चव्हाण, प्रल्हाद गणेश चव्हाण यांनी विश्वनाथ घारू यास  मारहाण करून शिवीगाळ केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज