fbpx

शेतजमिनीच्या वादातून एकावर विळ्याने वार; चौघांवर गुन्हा दाखल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । जळगाव तालुक्यातील डिकसाई येथे शेत जमिनीच्या वादातून तीन जणांन शिवीगाळ व विळ्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बाळू विनायक सपकाळे (वय-३८) रा. डिकसाई ता.जि.जळगाव हे शेती काम करून आपला कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. २६ जून रोजी दुपारी १ वाजता बाळे सपकाळे हे आई व वाहिनी शोभाबाई सपकाळे शेतात काम करत होते. दरम्यान शेत जमिनीच्या वादातून संशयित आरोपी रणजीत गोकुळ पाटील, योगेश गोकुळे पाटील, रणजित पाटील यांची आई व पत्नी सर्व रा. विदगाव ता. जि.जळगाव यांनी बाळू सपकाळे याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. 

त्यानंतर आई व वहिनी यांना अश्लिल शिवीगाळ केली. यात रणजीत आणि गोकूळ पाटील यांनी हातातील विळ्याने मारून गंभीर दुखापत केली. दरम्यान, जखमीवस्थेत बाळू सपकाळे याला जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होत. उपचार घेतल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बाळू सपकाळे याच्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज