fbpx

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार ; पाल येथील तरुणाविरोधात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । सध्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. पाल येथील तरुणाने मध्यप्रदेशातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून धमकी दिल्याप्रकरणी तरुणाविरोधात मध्यप्रदेशातील छिपाबड पोलीस ठाण्यात बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पाल येथील गुलाम रसुल नवाज तडवी असे या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिक येथे बाजारात फिरत असताना त्याची मध्यप्रदेशातील चारण्या (ता. खिरकीया, जि. हरदा) येथील एका आदिवासी युवतीशी भेट झाली. त्यांच्या या ओळखीतून मैत्री बहरली. दरम्यान, लॉकडाऊनमुळे युवक पाल येथे तर ती युवती चारण्या येथे परतले.

mi advt

दरम्यान, मोबाइलवर त्यांचा संपर्क सुरू होता. या तरुणाने तिला पाल येथे बोलावून घेतले आणि तीन दिवस आपल्या घरी ठेवून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर ९ सप्टेंबर रोजी असाच प्रकार घडला. याबाबत कुठे वाच्यता न करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित युवतीने मध्यप्रदेशातील छिपाबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळ रावेर तालुक्यातील असल्याने मध्यप्रदेश पोलिसांनी न्यायालयासमोर तिचा जबाब नोंदवून पाल येथील आरोपी गुलाम तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड, गुन्हा लेखनिक सहायक फौजदार प्रमोद चौधरी हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज