आंतरराष्ट्रीय कटक महोत्सवात जळगावच्या युवतींनी रोवला मनाचा तुरा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । ओरिसा राज्यातील कटक येथे दिनांक ३ जानेवारी ते ९ जानेवारी, २०२२ कालावधीत मानाच्या १३ व्या आंतरराष्ट्रीय कटक महोत्सवात जळगावच्या गंधर्वि कथक नृत्यालयाच्या संचालिका जास्मिन गाजरे “नृत्य गरिमा” आणि “नृत्य शिरोमणी” म्हणून गौरविण्यात आले.

जस्मिन गाजरे यांनी आपल्या शिष्या हिमानी महाजन, महेक फुलवानी, निलाक्षी चौधरी आणि रुद्राक्षी शिंदे यांच्या समवेत एकल आणि सामूहिक कथक नृत्य सादर केले. या महोत्सवातच कथ्थक नृत्य नैपुण्यासाठी जास्मिन गाजरे यांना “नृत्य गरिमा” आणि “नृत्य शिरोमणी” या दोन सन्मानपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात आले. जगभरातून वेगवेगळ्या देशांमधील ३६ कलाकार आपले शास्त्रीय नृत्य सादर करण्यासाठी या महोत्सवात शामिल झाले होते.

या महोत्सवाचे औचित्य साधत तेथे राष्ट्रीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात सेमी क्लासिकल नृत्य प्रकारात हिमानी महाजन, महेक फुलवानी, रुद्राक्षी शिंदे यांनी आपापल्या वयोगटात प्रथम तर निलाक्षी चौधरी हिने द्वितीय पारितोषिक मिळवत जळगावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकविले. या विशेष कामगिरीसाठी गंधर्वि कथक नृत्यालयचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -