तामसवाडी येथे तरुण शेतकऱ्याने शेतात गळफास घेत संपविले जीवन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे शेतात एका ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने झाडाला गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना ११ रोजी १० वाजता उघडकीस आली. याबाबत नंदलाल रामदास बेलदार यांच्या माहितीवरुन पाराेळा पाेलिसांत अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

नंदलाल बेलदार यांचे बंधू गोपाळ बेलदार हे ११ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी जातो असे सांगून गेले होते. परंतु, ते परत न आल्याने तपास केला असता गोपाळ बेलदार यांनी शेतात झाडाला गळफास घेतल्याची रोहित बेलदार यांनी माहिती दिली. त्यानंतर गाेपाळ बेलदार यांना तत्काळ कुटीर रुग्णालयात दाखल केले. परंतु, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले गेले. तपास प्रदीप पाटील करत आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -