अखेर तो बेपत्ता मुलगा सापडला

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । एक १५ वर्षीय मुलगा वडिलांसोबत वाद झाल्यामुळे रागाच्या भरात कुठेतरी निघून गेला होता. हा प्रकार १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडला. याबाबाद मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून हरविल्याची रामानंदनगर पोलीसात नोंद करण्यात आली होती.

सविस्तर असे की, शुक्रवारी सायंकाळी सेंट्रल कॉलनीतील अल्पवयीन मुलाचे वडिलांसोबत भांडण झाले. त्यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन मलगा घर सोडून कुठेतरी निघून गेला होता. दरम्यान, याप्रकरणी मुलाच्या आईच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यत आली होती.

अखेर कुटुंबीयांना तो रेल्वे स्थानकावर मिळून आला. याची पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज