डांगर येथे रानडुकरांनी फस्त केला साडेसात बिघे मका

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । डांगर बुद्रुक ( ता. अमळनेर ) येथील शेतकरी महिलेला रानडुकरांमुळे नुकसान सोसावे लागले आहे. साडेसात बिघे मका रानडुकरांनी फस्त केल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील डांगर बुद्रूक येथील शकुंतलाबाई सर्जेराव पाटील यांनी आपल्या शेतात साडेसात बिघे मका लावला होता. हा मका रानडुकरांनी फस्त केला. दहा दिवसांपुर्वी नुकसानीची माहिती वनविभागाला कळवूनही पंचनामा झाला नाही. त्यामुळे शेताची पुन्हा मशागत करून ते रब्बीसाठी तयार करता येत नाही. त्यामुळे लवकर पंचनामा व्हावे, तसेच मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज