fbpx

जळगाव महापालिकेचे सहायक आयुक्त आता बोदवडचे नवे मुख्याधिकारी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । जळगाव महापालिकेचे सहायक आयुक्त आकाश डोईफोडे यांची बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

राज्याच्या नगरविकास खात्याने जारी केलेल्या निर्देशानुसार जळगाव महापालिकेत सध्या सहायक आयुक्तपदी असणारे आकाश डोईफोडे यांची बोदवड येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. डोईफोडे आता बोदवड येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. बोदवड नगरपंचायतीच्या विकासकामांना आकाश डोईफोडे यांच्या नियुक्तीने वेग येण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज