जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२२ । आसाम रायफल्समध्ये करिअर करू पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सुरक्षा दल 1281 पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. ही सर्व पदे टेक्निकल आणि ट्रेड्समनशी संबंधित आहेत. इच्छुक उमेदवार ६ जूनपासून या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील.
पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) नायब सुभेदार (ब्रिज & रोड) 17
2) हवालदार (लिपिक) 287
3) नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) 09
4) हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन) 729
5) वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक) 72
6) रायफलमन (आर्मरर) 48
7) रायफलमन (लॅब असिस्टंट) 13
8) रायफलमन (नर्सिंग असिस्टंट) 100
9) वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) 10
10) रायफलमन (AYA) 15
11) रायफलमन (वॉशरमन) 80
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.
पद क्र.6: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण.
परीक्षा फी : २०० ते १०० रुपये अर्ज शुल्क म्हणून जमा करावे लागतील.
अर्जासाठी वयोमर्यादा किती?
आसाम रायफल्सने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदाराचा जन्म 1 ऑगस्ट 1999 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑगस्ट 2004 नंतर झालेला नसावा. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे वयाची सूट असेल.
त्याचप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गात येणाऱ्या माजी सैनिकांसाठी 3 वर्षे, OBC प्रवर्गात येणाऱ्या माजी सैनिकांसाठी 6 वर्षे आणि SC/ST प्रवर्गात येणाऱ्या माजी सैनिकांसाठी 8 वर्षांची वयोमर्यादा शिथिल असेल. सुरक्षा दलाने सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट देण्याची विशेष तरतूदही केली आहे.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा