fbpx

असोद्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । जळगाव तालुक्यातील आसोदा येथील २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या  केलीय. चेतन दिलीप चौधरी (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही आत्महत्या गुरूवारी दि ०१ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन चौधरी या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना १ एप्रिल रोजी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना घडताच त्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यायात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याची तपासणी केली असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मयत घोषित केले.

याप्रकरणी भरत चौधरी यांच्या खबरीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास विश्‍वनाथ गायकवाड हे करीत आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज